Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

आज पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन….

भाजपचे व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडीया यांच्या संकल्पनेतून… झरी तालुक्यातील गंगा माता मंदिर माथारजून येथे आयोजन…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून रविवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी माथार्जून येथे मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा, मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दु. 4 या वेळेत गंगा माता मंदिर येथे हे शिबिर होणार आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात केले आहे.

शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामची चमू आरोग्य सेवा देणार आहे. मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना सेवाग्राम येथे उपचारासाठी पाठवण्यात येईल. आवश्यक रुग्णांना चष्मे तयार झाल्यानंतर त्याचे वाटप केले जाणार आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तालुक्यातील, कोणत्याही गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.

य नाव नोंदणी न झालेल्या रुग्णांना वेळेवर शिबिर स्थळी नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी अजिंक्य अक्केवार 7498212268, राजू रिंगोले – 9284881655, अक्षय वैद्य – 8408809141, सचिन क्षीरसागर – 8308340293 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. या शिबिरासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विजय चोरडिया यांचे सहकारी परिश्रम घेत आहे.

गेल्या काही काळापासून वणी विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने नेत्र रोग चिकित्सा शिबिराचे आयोजन केले गेले. याचा आतापर्यंत हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. तर शेकडो रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली. हजारो रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular