भाजपचे विजय चोरडिया यांचा उत्तम उपक्रम….
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
प्रभू विश्वकर्मा म्हणजे देवतांचा कारागीर अशी समाजामध्ये समजूत आहे. पांचाळ समाजही त्याला अपवाद नाही. विश्वकर्मा वंशज म्हणून ज्या समाजाची ओळख आहे. त्यामध्ये सुतार,लोहार ,सोनार, तक्रकार आणि शिल्पकार यांचा समावेश आहे. सर्व सृष्टीला आकार देण्याचे काम प्रभू विश्वकर्मा करतो. प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस 17 सप्टेंबरला असतो या दिवशी प्रभू विश्वकर्मा यांची पूजा केली जाते.

17 सप्टेंबर या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येतो. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपचे धडाडीचे प्रदेश सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी गवंडी काम करून घराला आकार देणाऱ्या कामगारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. मजुरी करून आलेल्या कामगारांचा अचानक सत्कार झाल्याने कामगार भावुक झाले होते. विजय बाबू चोरडिया यांनी कामगारांचे विशेष आभार मानले कारण हे सर्व उत्कृष्ट कारागीर असून यांनी त उन्हाताना घर बांधण्याचा कार्य केलं त्याच्यामुळे आम्ही सर्व अशा उत्कृष्ट चांगल्या घरात राहू शकतो असे मनोगत व्यक्त केले.





