Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

गतिशील कार्य व विकास कार्य हेच माझं ध्येय : संजीव रेड्डी बोदकुरवार

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

जनतेचा विश्वास व प्रेम त्यामुळेच मी उत्तम कार्य करू शकलो…

भारतीय जनता पार्टीचा मी छोटासा कार्यकर्ता होतो, सतत कार्य करत राहलो. त्यामुळेच मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली वणी विधानसभा क्षेत्रामध्ये 2014 ला विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळाली आणि वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेने पक्षावर व माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. त्यामुळे मी जनतेचा विश्वास न गमवता वणी, झरी, मारेगाव या तीनही तालुक्यात विकास कार्य उत्तम केले असून जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला.

ज्या भागात कधीही रस्ते नव्हते तेथे आज उत्तम रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्यविषयक सुविधा पोहोचविले आहे. जनतेचे जे काही लहान मोठे काम, त्यांच्या समस्या त्यांनी शंभर टक्के सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. त्यामुळेच जनतेने 2019 मध्ये पुन्हा निवडून दिले आणि आज संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात त्यांचे विकास कामाचे कार्य मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळेच जनतेचा विश्वास व त्यांचे प्रेम आमदार बोदकुरवार यांच्यावर आहे. त्यामुळे मी यापुढेही जनतेची अशीच ईश्वर सेवा समजून सेवा कार्य करत राहील व जनता त्यांना विकास कार्य करणारे आमदार म्हणून कौतुकाने संबोधतात.

सर्व जनतेचे ऋणी असून सर्व जनतेचे प्रेम व आशीर्वाद माझ्या सोबत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… आमदार संजीव रेड्डी

विकास कामात सदैव अग्रेसर असणारे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

शुभेच्छुक : भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्र…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular