Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

प्रसिद्ध व्याख्याते, कीर्तनकार सोपानदादा करणेकर यांचे वणीत व्याख्यान….

28 सप्टेंबर ला होणार कार्यक्रम… विजय चोरडिया यांचे सामाजिक दायित्व…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

पारसमल प्रेमराज फाउंडेशन च्या सौजन्याने वणी येथे दिनांक 28 सप्टेंबरला दुपारी एक वाजता शेतकरी मंदिराच्या सभागृहात लाखो युवकांचे प्रेरणास्थान असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध ख्यातनाम वक्ते प्रखर विचारवंत हरिभक्त परायण कीर्तनकार सोपानदादा करणेकर यांचा युवकांच्या उज्वल भविष्याकरिता मार्गदर्शन व पालकांची भूमिका या विषयावर व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या जाहीर व्याख्यानाचा लाभ वणी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती व पालकांनी घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी केले आहे सोपानदादा करणेकर आपल्या प्रबोधनातून विद्यार्थी युवक युवतींना व पालकांना भगवद्गीतेद्वारे आवडेल त्या भाषेत यशाचा कानमंत्र देतात त्यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी सोपान दादा करणेकर यांचे व्याख्यान म्हणजे एक पर्वनीच असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular