AM न्यूज वृत्तांकन, वणी
शहरात नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून नवरात्र उत्सव हा वणी शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गरबा म्हणजे दांडिया उत्सव या उत्सवाचे आयोजन वणी शहरात ठीकठिकाणी केले जाते. यावर्षी वणी शहरात तीन मोठमोठ्या गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . त्यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच राजे गरबा महोत्सव 2024 चे वणी शहरातील वसंत जिनिंग शेतकरी मंदिराच्या लॉनमध्ये आयोजन केले आहे . यामध्ये दररोज गरबा उत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गिफ्ट दिले जाणार आहे यामध्ये तीन गट असून प्रत्येक गटात मोठमोठी बक्षीस आहे प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला इलेक्ट्रिक स्कूटर, वॉशिंग मशीन, सोन्याची नथ, यासह उत्कृष्ट कॉस्ट्यूम स्पर्धकाला दररोज पैठणी भेट दिली जाणार आहे गरबा महोत्सवात सहभागी स्पर्धकांना दररोज मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तर दररोज नवनवीन सेलिब्रिटी राजे गरबा महोत्सवाला भेट देणार आहे यामध्ये दिनांक 4 ऑक्टोबरला चला हवा येऊ द्या फेम मराठी कलाकार भारत गणेशपुरे यांचे विशेष आकर्षण असणार आहे. तर 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिद्ध मराठी कलाकार शिवाली परब , आणि दिनांक 10 ऑक्टोबरला महाराष्ट्राची लाडकी मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुळकर्णी वणीकरासोबत सोबत गरबा खेळणार आहे नवरात्रातील नऊ दिवस राजे गरबा महोत्सवात विविध कलावंतांची हजेरी लागणार असून वणी करांसाठी ही एक पर्वनीच असणार आहे या गरबा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही खेळणाऱ्यांसाठी आणि पाहणाऱ्यांसाठी निशुल्क सेवा दिली जाणार आहे होणाऱ्या गरबा महोत्सवात वणीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजे गरबा उत्सवाचे आयोजक आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग वणी आणि गौरीशंकर खुराना अध्यक्ष जनहित कल्याण संघटना यांनी केले आहे




