Sunday, July 26, 2026
Google search engine
spot_imgspot_img

स्वच्छता हि सेवा या संकल्पनेतून स्वच्छ्ता पंधरवाडा विविध कार्यक्रमाने साजरा…

लोकमान्य टिळक महाविद्यालयात स्वच्छता हि सेवा या संकल्पनेतून स्वच्छ्ता पंधरवाडा अनेक उपक्रमासह संपन्न

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी रा.से.यो.विभागाद्वारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉ. मिलींद बारहाते ,कुलगूरू , रा.से.यो. समन्वयक डॉ.निलेश कडू, प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे व यवतमाळ जिल्हा समन्वयीका डॉ.निलीमा दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेबंर पासून स्वच्छता ही सेवा ,स्वभाव स्वच्छता ,संस्कार स्वच्छता या विशेष संकल्पनेतून अनेक उपक्रमासह पंधरवाडा संपन्न झाला.

महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सर्वप्रथम स्वच्छतेचे शपथ घेऊन या स्वच्छ्ता पंधरवड्याची सुरुवात झाली. स्वच्छ्ता , आरोग्य व आहार या विषयावर डॉ.सुवर्णा चरपे ,आर्येवेदाचार्य तज्ञ यांनी रा.से.यो.स्वयंसेवकांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी,व्यायामाचे महत्व तसेच आहार जर उत्तम ठेवला तर निरोगी आयुष्य लाभत असा संदेश व्याख्यानातून दिला. तसेच दुसरे व्याख्याते प्रा. प्रफुल्ल कोसे यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभियाना अंर्तगत माझ कॉलेज स्वच्छ कॉलेज हे ब्रिद घेवून महाविद्यालयात साफसफाई अभियान राबविण्यात आले .

वणीतील चौका चौकांत पथनाट्यातून संदेश देत गावकऱ्यांना सोबत घेवून कचरा हटवा गांव वाचवा हे नारे देत विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली . नुसते पुतळे बसवुन ठेवणे ही श्रद्धां नसून त्यांची स्वच्छता देखिल केल्या गेली पाहीजे हे ध्येय समोर ठेवून वणी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता देखिल करण्यात आले. श्रद्धास्थानी असलेले मंदिर , मज्झीद, बुद्धविहारे बाजूचा परिसर रा.से.यो.विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. स्वच्छता हेच जीवनाचा मुलमंत्र आहे. संत गाडगेबाबाच्या स्वच्छता अभियाना समर्पीत स्वच्छता जनजागरण रँली काढण्यात आली.

याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयाची मुक्केवार यांनी रॅलीला हिरवी झेंडे दाखवून स्वच्छता अभियानाला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयात स्वच्छता हाच स्वभाव स्वच्छता हेच संस्कार व स्वच्छता हाच संकल्प या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली यात १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

महाविद्यालयात ही पोस्टर प्रर्दशनी सर्वांनकरीता खुली करण्यात आली.सामुहीक चर्चा देखिल सदर विषयावर घेण्यात आली. बेस्ट पासून बेस्ट या संकल्पने अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वेस्ट कपड्या पासून कापडी पिशव्या शिवून आणून प्लास्टिक निर्मूलन या अंतर्गत भाजीवाले फळवले या लोकांमध्ये या कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक मुक्त भारत यासाठी जनजागृती केली. स्वच्छते वर आपल्या सर्वांचे आरोग्य निर्भर आहे या संकल्पनेतून आरोग्य शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले . अश्या अनेक उपक्रमासह सदर पंधरवाड्याची सांगता करण्यात आली . यात रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी तथा यवतमाळ जिल्हा समन्वयीका डॉ.निलीमा दवणे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.विकास जूनगरी आणि विद्यार्थी यांनी स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.


RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular