भाजपा महिला जिल्हा महामंत्री संध्या लोडे यांच्या वाढदिवसानिमित्त रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
भारतीय जनता पार्टी च्या जिल्हा महिला महामंत्री संध्या लोडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय येथे भोजनदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. संध्या लोडे या मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय सदस्य असून,भारतीय जनता पार्टीचे लोकोपयोगी कामे त्या जनतेपर्यंत पोहोचवीत असतात.

या वाढदिवस सोहळ्याला आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, सामाजिक कार्यकर्ते व धडाडीचे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, ललिता बोदकुरवार ,दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, मंगला पावडे, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल कुत्तरमारे, संस्थेचे मेघराज भंडारी, जितेंद्र भंडारी, सरोज भंडारी, यासह शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.





