AM न्यूज वृत्तांकन, मारेगांव
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार व अभ्यासक्रमानुसार बि. एस. सी भाग १, २ व ३ च्या विद्यार्थ्यांची जैवविविधतेने समृद्ध असलेल्या घोडाझरी आणि मुक्ताई क्षेत्रात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयतील वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे महत्त्व समजून देण्यासाठी आणि पर्यावरण विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या सहली मध्ये विद्यार्थी, शिक्षक, पर्यावरणतज्ज्ञ, आणि स्थानिक मार्गदर्शक सहभागी झाले होते. घोडाझरी आणि मुक्ताई हे क्षेत्र त्यांच्या समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या क्षेत्रात अनेक दुर्मीळ वनस्पती आणि प्राणी आढळतात. तसेच येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचे देखील दर्शन होते, जे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत.
सहल दरम्यान विद्यार्थ्यांना वनस्पती, प्राणी आणि पक्षी यांची माहिती देण्यात आली. याशिवाय, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, जैवविविधतेचे रक्षण आणि या क्षेत्राच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याची माहिती तज्ज्ञांमार्फत दिली. सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षणाची जाण आणि जैवविविधते बद्दलची कृतज्ञता निर्माण करणे हे होते. सहलीत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ येऊन त्यातून काही महत्त्वपूर्ण शिकायला मिळाव हा उद्देश होता.

जैवविविधतेची ओळख आणि महत्त्व, वनस्पती व प्राणी यांची माहिती, स्थानिक पाणथळ, जागांचा अभ्यास,
पर्यावरणस्नेही जीवनशैलीविषयी मार्गदर्शन मिळाले.
विद्यार्थ्यांचा अनुभव: या सहलीमुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमानुसार महाविद्यालया बाहेर जाऊन निसर्गाशी थेट संबंध जोडता आला. पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
शैक्षणिक सहल संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि शिकलेले धडे इतरांसोबत शेअर करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
या प्रकारच्या शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतील. या सहलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी परवानगी देवून सहकार्य केले. या सहलीचे नियोजन प्रा. डॉ. विनोद चव्हाण वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. तसेच प्रा. बाळासाहेब देशमुख, डॉ. सुधीर चिरडे, प्रा. स्नेहल भांदककर, प्रा. प्रदीप माकडे, डॉ.अनिल अडसरे, प्रा. माधुरी शेंडे, अभिजित पंढरपुरे व आकाश कुमरे यांनी सहल आयोजित करण्यात मोलाचे सहकार्य केले.




