Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

पहिल्याच यादीत नाव आल्याने जल्लोष…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी करिता पहिल्याच यादीत नाव जाहीर झाले आणि जल्लोषाला सुरुवात झाली.

काही दिवसापासून संजीव रेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी मिळणार की नाही अशी चर्चा सर्वत्र होती. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात एकच चर्चा होती, भाजप तर्फे उमेदवारी कोणाला मिळणार आहे. हा एकच प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. मात्र काल रविवारी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती व आमदार संजीव रेड्डी बोलत असताना अचानक नाव आले आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. सर्व आश्चर्यचकित झाले, नेमकं काय झालं आणि आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी जाहीर झाले त्यांचे नाव यादीत आले, वृत्तवाहिनीवर नाव झळकले असे सांगण्यात आले आणि आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी आनंद व्यक्त केला, पक्षाचे व जनतेचे आभार मानले. माझ्या केलेल्या कार्यासाठी पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली.

यावेळी रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे रवी यासह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular