AM न्यूज वृत्तांकन, वणी
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वांना तिकीट मिळणार की नाही याची काळजी लागली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा बालेकिल्ला 2014 मध्ये भाजपने जिंकला आणि 2019 मध्ये सुद्धा भाजपने जिंकला मात्र 2024 ला झालेली लोकसभा निवडणूक ही कलाटणी देणारी व काँग्रेस साठी दमदार झाल्याने व देशात काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाल्याने सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच जोमाने कामाला लागले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरस वाढली आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात भाजप, शिवसेना उबाठा गट, काँग्रेस या पक्षात एकापेक्षा एक दमदार पुढारी असल्याने प्रत्येकाला उमेदवारी मिळावी यासाठी पूर्णतः प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी वारंवार दिल्ली, मुंबई व मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. सध्या वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व नेते कोणी मुंबई तर कोणी दिल्लीमध्ये गेलेले आहे आणि सर्व जनतेला उत्सुकता लागलेली आहे की 2024 च्या निवडणुकीचे कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार उभा राहणार आहे. सध्या महाविकास आघाडी मध्ये गल्लीत गोंधळ , दिल्लीत मुजरा असं सुरू आहे.

जर एखाद्या नेत्याला त्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर स्वतंत्र उमेदवार म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढणार का अशी जोरदार चर्चा वणी विधानसभा क्षेत्रात सुरू आहे. येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल यात तीळमात्र शंका नाही.




