काँग्रेसमध्ये नैऱ्याशाचे वातावरण…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
सूत्रानुसार संजय देरकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाली असून त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून काँग्रेसच्या खासदारांसह, पदाधिकारी यांनी दिल्लीमध्ये ठिय्या मांडला आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी जोरदार युद्ध सुरू आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र सूत्रांच्या खात्रीलायक वृत्तावरून संजय देरकर यांना शिवसेना उबाठा तर्फे जाहीर झाली आहे. मात्र अधिकृतरित्या जाहीर व्हायची असल्यामुळे काँग्रेसची सर्व ताकद दिल्लीत जाऊन बसली असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वणी विधानसभा क्षेत्र असल्याने ही उमेदवारी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे याकरिता दिल्लीमध्ये सर्व आग्रही आहेत.

महायुतीचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना दमदार लढा देण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार शेवटपर्यंत लढा देण्यास समर्थ आहे. त्यामुळे जर वामनराव कासावार यांना उमेदवारी मिळाली किंवा संजय देरकर यांना उमेदवारी मिळाली तर पुन्हा भाजपचे उमेदवार जिंकण्यासाठी शर्यत संपेल, असे सर्वत्र जनता चर्चा करत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून नवीन व दमदार उमेदवार मिळाला पाहिजे अशी नागरिकांची सर्वत्र चर्चा सुरू आहे.




