AM न्यूज वृत्तांकन, वणी
वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये कोणाला मिळणार उमेदवारी हा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे. वणी शहरात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला मिळणार ?

शिवसेना उबाठा चे संजय देरकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. असे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहे. त्यामुळे वणी शहरातील चौका चौकात एकच चर्चा सुरू झाली आहे. मात्र जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत ही चर्चा थांबनार नाही. आता प्रतीक्षा ती अधिकृत घोषणेची आहे. त्यामुळे मतदार राजाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकी संपल्या की लवकरच अधिकृत नाव येईल आणि खर काय ते लवकरच कळणार यात मात्र शंका नाही.




