Wednesday, September 9, 2026
Google search engine
spot_imgspot_img

ब्रेकिंग न्यूज : संजय खाडे निवडणुकीच्या रिंगणात… चौरंगी लढत होणार…

दमदार उमेदवार आल्याने निवडणुकीत चुरस वाढली… प्रतिस्पर्ध्यांना निवडणुकीमध्ये वाढली डोकेदुखी…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

विधानसभा निवडणूक आता चांगलीच दमदार होणार यात मात्र शंका नाही. काँग्रेसचे संजय खाडे अपक्ष उमेदवार म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढणार आहे. अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे.

महाविकास आघाडी कडून विधानसभा क्षेत्राची उमेदवारी शिवसेना उबाठा चे संजय देरकर यांना मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वणी विधानसभा क्षेत्र असल्याने काँग्रेसलाच उमेदवारी मिळायला पाहिजे असे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे आता सांगलीचा विशाल पाटील पॅटर्ननुसार वणी विधानसभेत संजय खाडे निवडणूक लढणार आहे. संजय खाडे लढणार… जनता जिंकणार.. असे सोशल मीडियावर फोटो वायरल करणे सुद्धा सुरू झाले आहे.

मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचे संजय खाडे यांनी तळागाळातील सर्व सामान्य माणसांची नाते जोडून आणि सर्वसामान्य व्यक्तींचे असलेल्या समस्या त्यांनी दूर केल्या आहेत. त्यामुळे ल संजय खाडे यांनी ही निवडणूक लढावी असा आग्रह धरण्यात येत आहे. संजय खाडे आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने व त्यांचे या क्षेत्रात चांगलेच वर्चस्व असल्याने भाजप, मनसे यांना विजयासाठी चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.

काँग्रेसचे संजय खाडे हे संजय देरकर समोर तगडा उमेदवार आहे असे मतदार चर्चा करत असल्याने ही निवडणूक जिंकतील का असा प्रश्न निर्माण होतो आहे. संजय खाडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांचे समर्थक यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular