रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे आयोजकांचे आवाहन…
दिवाळीत धनत्रयोदशीला पहाटे ६ वाजता कीर्तन घेण्याच्या जैताई मंदिराच्या अभिनव उपक्रमाला या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचे रौप्यमहोत्सवी कीर्तन नागपूरच्या
कीर्तनकार मृण्मयी कुळकर्णी व नुपूर देशपांडे ह्या
संयुक्त रीत्या सादर करणार आहेत. विशेष म्हणजे त्या ‘ शिवराज्याभिषेक सोहळा ‘ आपल्या आख्यानातून सादर करणार आहे.

कीर्तन २९ ऑक्टोबर मंगळवारी धनत्रयोदशीला पहाटे ६ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. कीर्तनाचे आयोजन जैताई मंदिर व राज मंडप डेकोरेशनने केले आहे. कीर्तन कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर, स्व.नरेंद्र नगरवाला विमलताई धोटेचे मातापिता व स्व.गणपतराव व सरस्वतीबाई
बिलोरीया यांच्या स्मरणार्थ आयोजित आहे.
या दिवाळीचा खरा आनंद देणार्या कीर्तनाच्या आनंदोत्सवात रसिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.





