Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

कोण जिंकणार… कोणाचा झेंडा फडकणार… जनता कोणाच्या बाजूने…

कोण उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार….

AM न्यूज वृत्तांकन, वणी

दिवाळीचा सण सर्वजण आनंदात साजरा करत असून अतिशय जल्लोषात घरोघरी फटाके फोडण्याचा आनंद नागरिक घेत आहे मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये 23 नोव्हेंबरला कोण जिंकल्यावर फटाके फोडणार गुलाल उधळणार हे मात्र गुपित आहे.

वणी विधानसभा क्षेत्रावर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विकास पुरुष, कामाचा माणूस किंवा साधा माणूस या तिघांमध्ये कोणाचा झेंडा फडकणार यावर सध्या चर्चेला चांगलेच उधान येत आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात 2014 पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेमध्ये भाजपचा झेंडा फडकला आणि 2019 मध्ये पुन्हा भाजपने बालेकिल्ला शाबूत ठेवला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला भाजपचे विकासपुरुष संजीव रेड्डी बोदकुरवार हे पुन्हा विजय होतील का ? शिवसेना उबाठा गटाचे साधा माणूस म्हणून सर्वत्र परिचयाचे आणि वणी, झरी,मारेगाव तालुक्यामध्ये एक स्वतःच अस्तित्व व स्वतःचा सशक्त मतदार ठरलेला असल्याने संजय देरकर हा किल्ला जिंकणार का ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहून तिन्ही तालुक्यांमध्ये जनतेच्या मदतीसाठी धावणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्षनेता ज्याने आपली स्वतःची ओळख कामाचा माणूस म्हणून निर्माण केली आहे, असे राजू उंबरकर मनसेचा झेंडा फडकवणार का ? याबाबत नागरिक चर्चा करत आहे.

प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदार राजांच्या भेटी घेऊन आपल्या कामाची माहिती व स्वतःचा अजेंडा काय आहे. याबाबत आपले मत प्रचारादरम्यान बोलताना दिसत आहे. मात्र मतदार राजा हा आता कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कोणाला मतदान करेल का ? हा प्रश्न सर्वांना पडला असून वणी विधानसभा क्षेत्रात बालेकिल्ला कोणाचा असणार, कोणाचा झेंडा फडकणार यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular