Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

ब्रेकिंग न्यूज : लढणार व जिंकणार … निवडणूक होणार दमदार…

काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात.. चौरंगी लढतीमुळे चुरस वाढली…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी विधानसभा क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आणि ज्यांनी सर्वसामान्य माणसांच्या भावना, त्यांच्या समस्या सोडण्याकरिता सतत आंदोलने करून त्यांच्यासोबत सलोख्याचे नाते तयार करून स्वतःच एक अस्तित्व तयार करणारे वणी विधानसभा क्षेत्रातील मनमिळाऊ व लढाऊ व्यक्ति म्हणजे काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे हे 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार आहे.

दिनांक 29 ऑक्टोबरला काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता फॉर्म भरला आहे. त्यामुळे आता वणी विधानसभा क्षेत्राची निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून संजय खाडे हे निवडणुकीच्या रिंगणात आल्याने इतरांना विजय मिळणार नाही हे चित्र स्पष्ट दिसत आहे.

जनहित केंद्र सुरू करून गावागावात फिरून सर्व सामान्य व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारे संजय खाडे यांची लोकप्रियता आणि मतदार राजा सोबत असणारे संबंध अतिशय जवळीक असून गावागावात घराघरात पोहोचणारे संजय खाडे यांच्या बद्दल वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिक आपला माणूस, चांगला माणूस, मदत करणारा माणूस, समस्याचे निराकरण करणारा माणूस, म्हणून त्यांची ख्याती आहे. आता संजय खाडे लढणार आणि जिंकणार या ब्रीद वाक्याने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. अशी गोपनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. आता सर्वांच्या विजयाच्या अपेक्षेचा भंग होणार हे मात्र खरं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular