कामाचा माणूस मला म्हणतात कारण मी जनतेचे प्रश्न व समस्या सोडवतो….. या विधानसभा क्षेत्रात मी जनतेसाठी काम केला आहे.
AM न्यूज वृत्तांकन, वणी

वणी विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत होणार आहे. यात मात्र शंका नाही. या निवडणुकीच्या भाजप च्या संजीव रेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे उबाठा गटाचे संजय देरकर तसेच संजय खाडे आणि इतर उमेदवार यांची गणित बिघडणार याची शक्यता आहे. कारण राजू उंबरकर निवडून येण्यास सक्षम आहे. कारण ते सत्तेत जरी नसेल तरी त्यांनी जनतेसाठी काम केले असल्याने ते कामाचा माणूस व जनतेला न्याय मिळवून देण्यास योग्य व्यक्ती असल्याचे नागरिक चर्चा करत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेता आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून अधिकृत उमेदवार राजू उंबरकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात. बेरोजगारीचा प्रश्न आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असून त्या मुलांना मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांच्या शिक्षणाानुसार रोजगार मिळवून दिला आहे. म्हणून कामाचा माणूस आहे.

वणी, झरी, मारेगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये महिला, वृद्ध, तरुण, विद्यार्थी, शेतकरी, शेत मजूर, कामगार त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा राजू उंबरकरांना ओळखतो आणि कोणाचं जर काम अडलं असेल तर राजू उंबरकर कडे येऊन ते आपली समस्या सांगतात आणि राजू उंबरकर ती समस्या नक्कीच सोडवतात हे सगळ्यांना माहित आहे, तो विश्वास जनतेला आहे. मी निवडणुकीसाठी काम करत नाही तर दिवस-रात्र जिंकलो किंवा हरलो तरीही मी काम केलं आणि करतच राहणार आहे.

आरोग्याचा प्रश्न कोळसा खाणीमध्ये आपल्या भागातील तरुणांना कंपनीमध्ये घेण्यासाठी आंदोलन करणे, शेतकऱ्यांना कोणती समस्या असेल त्यांच्यावर कुठलाही अन्याय झाला असेल तर मी सदैव धावलो आहे. त्यांच्यासाठी मी पोलिसांचा मार सहन केला आहे. शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी म्हणून मी आंदोलन केले आहे, किती तरी समस्या मी सोडवल्या आहे. म्हणून मी कामाचा माणूस आहे.

रस्ते बांधणे म्हणजे विकास होय हे चुकीच आहे, रस्ते बांधताना त्याचा दर्जा व लोकांचे घर खराब करणे, त्यांच्या दुकान खराब करणे, रस्ता खोदून बांधायचा तर तुम्ही उंच केला. त्यामुळे किती लोकांचं नुकसान केलं, याला कसला विकास म्हणायचा नियोजन शून्य काम करणारे सत्ताधारी हे कसले विकासाचे कार्य करतात. चुकीचं काम करतात म्हणून मी बोलतो, मी कोणाला घाबरत नाही. असे राजू उंबरकर ठामपणे आपले मत मांडतात.

या निवडणुकीमध्ये जनतेने मला सभागृहात पाठवावं या भागाचा विकास मी नक्की करणार आरोग्याचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यासाठी गाड्यांचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, सरकारी दवाखान्यात योग्य उपचार झाला पाहिजे. असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्तेत येऊन या अधिकाऱ्यांना जाब विचारणार सभागृहात प्रश्न मांडणार यासाठी जनतेने माझ्या कामाची पावती मला द्यावी आणि या येणाऱ्या 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीत मला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावं असे मनोगत त्यांनी बोलताना व्यक्त केले आहे.






