Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

तहसीलदारांची कारवाई : अवैध वाहतूक करणारा वाळूचा ट्रक पकडला…

मारेगाव : अवैध वाळू वाहतूक करत असलेला ट्रक महसूल विभागाच्या पथकाने आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास सावंगी शिवारातून पकडला आहे. सदरहू कारवाईने वाळू माफियांना चाप बसवला आहे.

उपविभागीय अधिकारी, वणी यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/12/2024, गुरुवार रोजी सकाळी ठिक 8.30 वाजताचे दरम्यान मौजे सावंगी शिवारातून अंदाजे 13 ब्रास अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करीत असतांना मोठा ट्रक क्र. (एम एच 40,सी टी 0776) हे वाहन स्वतः तहसीलदार यांनी पकडून तहसील कार्यालय मारेगांव येथे जमा करण्यात आलेला आहे.

यावेळी स्वतः तहसीलदार उत्तम निलवाड मारेगांव, तलाठी वानखेडे, शिंगणे, गुणवंत, कुडमेथे, विकास मडावी, कोतवाल दिलीप पचारे इत्यादी उपस्थित होते. या धडक कारवाई ने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular