Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

चर्मकार समाजातील भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजन…

राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी यवतमाळ च्या वतीने आयोजन…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ वणी च्या वतीने चर्मकार समाजातील वधू व वरांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा दि. १५ फेब्रुवारी २०२५ ला श्री. संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र वणी येथे आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ विदर्भ अध्यक्ष संबा वाकुजी वाघमारे यांच्या पुढाकारातून करण्यात येणार आहे. या विवाह सोहळातील १. वधू व वरांच्या लग्न बस्ता (कपडे ) ची व्यवस्था २. वधू व वरांची भव्य वरात ( मिरवणूक ) ३. दर्जेदार वाद्य, बँड व्यवस्था, ४. वरांसाठी आकर्षित अशी बग्गी किंवा घोडी ची व्यवस्था ५. वधू व वर यांच्या कडील पाहुण्यांची भोजन व्यवस्था ६. वधू वरांसाठी राहण्याची व्यवस्था वरील सर्व व्यवस्था राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी द्वारे करण्यात येईल.

इच्छुकांनी आपल्या नावाची नोंद १५ जानेवारी पर्यंत करावी तसेच नाव नोंदविण्यासाठी ९९२२९५६९५६ , ८६५७४१२३८९ , ९७६३५७८४३३ , ७६६६०८९३२७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संबा वाकुजी वाघमारे विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular