Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबीरातून विविध उपक्रमाची मांदीयाळी….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संलग्नीत लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे रा.से.यो.चे विशेष श्रमसंस्कार शिबीर नुकतेच २१ ते २८ डिंसेबर २०२४ या दरम्यान दत्तक ग्रांम वांजरी येथे संपन्न झाले. २२ डिसें ला उद्घाटन संमारभ शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाला. दि.२३ ते २७ पर्यत दत्तक ग्रांम वांजरी येथे श्रमदानातून स्वच्छता अभियान, गावात शोषखड्डे व वृक्षारोपण करण्यात आले. गुरूदेव सेवा मंडळ ग्राम दिंडीत सहभाग ,पथनाट्य ,लोकनाट्य यातून प्रबोधन करणे तसेच ग्राम सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले. 135 झाडाचे वृक्षारोपन केले. असे विविध कार्य श्रमदानातून या शिबिरा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले.

या सात दिवशीय शिबिरात दैनंदिन जीवनात राष्ट्रभक्ती याविषयावर गजानन कासावार सिनेट सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे व्याख्यान संपन्न झाले. रात्री विद्यार्थ्याचे कविसंम्मेलन झाले. व्यक्तीमत्व विकास या विषयावर बौध्दीक सत्रात किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी यांचे व्याख्यान, कलावंत मंगेश गोहोकार व चमू यांनी बालनाट्य सादर केले.

मानवी देहाचे वैद्यकीय दृष्टीने जतन या वर डॉ.सुवर्णा चरपे सोनारे आयुर्वेदिक परिक्षण व नाडीतज्ञ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावकरी आणि विद्यार्थी याचे आरोग्य तपासणी करण्यात आली व महीला मेळावा संपन्न झाला. रात्री कलावंत आकाश महांडूळे यांनी प्रहसन सादर केले.

विद्यार्थी जिवन : संस्कार आणि करियर यावर प्रा.डॉ.एन.आर.पवार कला वाणिज्य महाविद्यालय मारेगाव यांचे व्याख्यान झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जि.प. उ. प्राथमिक शाळा येथील विद्यार्थांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला. बौद्धिक सत्रात विद्यार्थ्याचे सामाजिक दायीत्व याविषयावर डॉ.मनोज जंत्रे यांचे व्याख्यान झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्रहसन , नृत्य,नाटिका सादर केले.

दि.२८ ला शिबीराचा समारोह संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार तसेच सहसचिव अशोकर सोनटक्के, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तसेच वांजरीच्या सरपंच्या अरुणा जेणेकर, उपसरपंच अमोल कुंभारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजू कुंभारे पोलीस पाटील सुनीता तेलतुंबडे , ग्रामपंचायत सदस्य आकाश काकडे आणि महेश तेलतुंबडे याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे यांनी केले त्यांनी शिबिराचा पूर्ण आढावा आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील कामगिरीचा खुलासा केला , गावच्या सरपंच अरुणा जेनेकर यांनी शिबिरासाठी गाव निवडल्याबद्दल आणि विकासात्मक कार्यक्रमांमध्ये हातभार लावल्याबद्दल लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राचार्य आणि अध्यक्षांचे आभार मानले.

प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून लागलेल्या सवयी जीवनात कायम ठेवाव्यात असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत देताना विजय मुकेवार यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे दालन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय . विद्यार्थ्यांनी राष्ट्र विकासासाठी आपल्या आयुष्यातील काही क्षण देत राहावे असे मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आले. उत्कृष्ट स्वयंसेवकांमध्ये रजनी गारघाटे, मोनिका क्षीरसागर, प्रगती बढे, ऋतुजा रामगीरवार, अक्षय राजनलावार, विशाल बोंडे, गौरव झाडे व गौरव ठेगणे, विनय पुराणकर अशा सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. वांजरी येथील प्रतिष्ठित नागरिक विकास जेनेकर, ग्रामपंचायत वांजरी येथील ऑपरेटर विजय बोबडे, कर्मचारी कमलाकर परचाके, मदतनीस शकुंतला यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ . नीलिमा दवणे यांनी केले. प्राचार्य प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी रा.से. यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी, संजय बिलोरिया यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular