Tuesday, September 8, 2026
Google search engine
spot_imgspot_img

शाळेची बस सेवा तात्काळ पूर्ववत करा : मनसेची मागणी….

शालेय विद्यार्थ्यांसाठी वेकोली प्रशासनाने अचानक बंद केली शाळेची बस…..

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

तालुक्यातील तरोडा, निलजई आणि बेलोरा गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वेकोली प्रशासनाने अचानक बंद केलेली स्कूल बस सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेने म्हटले आहे.


मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सब एरिया निलजई, वेकोली (WCL) प्रशासनाकडे याबाबत निवेदन दिले आहे. मागील काही दिवसांपासून तरोडा, निलजई, बेलोरा मार्गे घुग्गुस येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली बस सेवा वेकोली प्रशासनाने अचानक थांबवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी लांबचा प्रवास पायपीट करून करावा लागत आहे किंवा त्यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. यात विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून, त्यांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होत आहे.

त्यामुळे या अनपेक्षित निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. वेकोली प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही बस सेवा तात्काळ पूर्ववत करावी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तालुका वणी विनंती करत आहे.


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व सोयीस्करपणे शाळेत पोहोचता यावे यासाठी ही सेवा पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मनसेने अधोरेखित केले आहे. मनसेने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन तरोडा येथील स्कूल बस सेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याची नम्र विनंती केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


यावेळी या गावातील विद्यार्थी तसेच मनसेचे मिथुन थोटे, सुरज काकडे, धीरज बगवा, योगेश माथनकर, प्रवीण मांडवकर, हिरा गोहोकार, गणेश खरवडे, प्रतिक बुरटकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular