AM न्युज वृत्तांकन, वणी
वणी:- मारेगाव रस्त्यावरील सोमनाळा फाट्याजवळ आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा जखमी असल्याची घटना घडली. प्रवीण तुळशीराम येरमे ४५ वर्ष रा. पांढरकवडा (पिसगाव) ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे.
प्रवीण व रवी हे सख्खे चुलत भाऊ असून काही कामानिमित्त वणी येथे आले होते. काम आटोपून सायंकाळी ते दुचाकीने आपल्या गावी परत जात असताना सोमनाळा फाटा येथे टिप्पर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात पिसगांव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण येरमे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी वर मागे बसलेला त्यांचा चुलत भाऊ रवी येरमे हा सुदैवाने बचावला. या घटनेने गावात शोककळा पसरली. पोलीस पुढील तपास करीत आहे.




