विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्या जण्यासाठी अटो रिक्षाची व्यवस्था…..
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी परिश्रम घेणे फार महत्त्वाचे आहे. आजचा विद्यार्थी हा देशाचा उत्तम नागरिक होतो, हेच विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. सरकारी शाळेत शिकणारे विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत उत्तम कार्य करण्याची क्षमता असते, त्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या देशाचे उत्तम नागरिक होऊन आपल्या देशाचं भविष्य आहे. म्हणून त्यांना योग्य त्या सुविधा शैक्षणिक साहित्य शालेय वस्तूची आवश्यकता असते. असे मनोगत ऍड. ख्याती चोरडिया यांनी व्यक्त केले.

क्रांतिवीर बिरसा मुंडा शाळा क्रमांक 9 येथे शाळा पूर्व मेळावा निमित्त शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि वणी परिसरातील लोकप्रिय दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्याची जाण असणारे व जनसेवा हीच ईश्वरसेवा समजणारे विजय चोरडिया यांनी शाळा क्र 9 ही दत्तक घेतली असून यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी रोज शाळेत येण्या जण्यासाठी अटो रिक्षाची व्यवस्था करून दिली आहे.

कार्यक्रमाचे संचालन वेणू कोटरंगे यांनी केले. यावेळी BRC साधन व्यक्ती विनोद नासरे, न.प. शाळा क्र 5 च्या मुख्यद्यापिका मीना काशीकर, शाळा क्र 9चे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार, शाळा समिती अध्यक्ष दुर्गा गोवर्धन, अंगणवाडीच्या शेख , लक्ष्मी मुत्यालवार उपस्थित होत्या.





