Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

मदत करायला इच्छा शक्ती पाहिजे… मदत करणे हाच खरा धर्म…. विजय चोरडिया

शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे… विद्यार्थी देशाचे भविष्य….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व, समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहणारे विजय बाबू चोरडिया यांनी एका मुस्लिम कुटुंबातील विद्यार्थिनीला दरवर्षी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून त्या विद्यार्थिनीला विजयबाबू चोरडिया यांनी अठरा हजार रुपयाची मदत केली.

वणी शहरातील रहिवासी मिस निजबा शेख सत्तार ही विद्यार्थिनी नागपूर येथे एल.एल.बी चा कोर्स करत आहे. त्यासाठी शैक्षणिक खर्च शैक्षणिक फी म्हणून दरवर्षी 18 हजार रुपये देण्याचे विजयबाबू चोरडिया यांनी कबूल केले होते. मागील वर्षी त्या विद्यार्थिनीला अठरा हजार रुपये देण्यात आले आणि याही वर्षी त्या विद्यार्थिनीला 18 हजार रुपये देऊन विजय बाबू चोरडीया यांनी आपला शब्द पूर्ण केला.

पुन्हा पुढील वर्षी ही मिस निजबा शेख सत्तार या विद्यार्थिनीला 18 हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे विजय बाबू चोरडिया सर्व धर्म समभावाची भावना जपत असल्याचे दिसून येत आहे. माणुसकी ही फार महत्वाची आहे, विद्यार्थ्यांचे शिक्षण खूप महत्वाचे आहे कारण आपल्या देशाचे भविष्य आहे. असे विजय चोरडिया यांचे विचार आहे. म्हणून समाजातील प्रत्येक घटकासाठी ते मदत करतात. आज त्यांची ख्याती सर्वत्र धर्मदाते, दानशूर, गरीबांचे देवता म्हणतात हे खोटं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular