
AM न्यूज वृत्तांकन, वणी
स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन द्वारा विजय चोरडिय़ा यांच्या दातृत्वातून वणी तालुक्यातील शिंदोला येथे भव्य नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचा लाभ 700 च्या वर रुग्णांनी घेतला आहे. शिबिर झाल्यानंतर लगेचच 54 नेत्र रुग्णांना सेवाग्राम येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. 350 रुग्णांना चस्मे व औषधी देण्यात आले. या शिबिरात शुगर, बीपी आणि इतर आजाराचे निदान करण्यात आले. शिंदोला येथील रत्नकला कार्यालयात शिबिराचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शांतीलाल जैन, डॉ. अमोल चौधरी, डॉ. रोहित चोरडिया व सेवाग्राम येथील डॉक्टरांची चमू उपस्थित होती.

या शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आले तसेच ज्यांना चस्म्याची गरज आहे अशा रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. जे रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी पात्र ठरले त्या सर्व रुग्णांना विजय बाबू चोरडिया यांच्या वतीने मोफत नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, चोरडिया हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम च्या चमूने सहकार्य केले.





