Wednesday, September 9, 2026
Google search engine
spot_imgspot_img

विधानसभेची जय्यत तयारी सुरू… उमेदवार कोण असणार…सर्वच दावेदार ….

तिकीट मिळविण्यासाठी…. देवाला साकडे घालणे सुरू…. विधानसभा निवडणुकीचे वारे झाले सुरू…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

लोकसभेचा निकाल वेगळाच लागला असून एकतर्फी लागला. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. आता विधानसभा निवडणुकीचे वारे खूपच जोऱ्यात व्हायला लागले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात कोणत्या पक्षाकडून कोण उभे राहणार हा प्रश्नचिन्ह उभा आहे ? सगळीकडे नागरिक या विषयावर चर्चा करत असून अनेक उमेदवार पक्षश्रेष्ठींकडे वारंवार भेट देत असून आपल्या कार्याची पावती आपण केलेले कार्य व जनतेत असलेली प्रतिमा याची माहिती त्यांना देऊन योग्य उमेदवार मी असल्याचा सांगण्यात येत आहे.

विधानसभा बांधण्याकरिता सर्वजण तयारीला लागले असून आमदार होण्याचे स्वप्न प्रत्येकाला पडू लागलेले आहे. काही उमेदवार तर वारंवार अपयशी होताना दिसत आहे, तरी त्यांनी पुन्हा कंबर कसली आहे. मात्र मतदारांना नवीन चेहरा पाहिजे आहे अशी चर्चा सगळी कडे सुरू आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात नवोदित उमेदवार तसेच अनेक इच्छुक उमेदवार व जुने चेहरे असे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हा प्रश्न जनतेला पडला आहे. मागील अनेक वर्षापासून जे उमेदवार निवडणुकीत विजयी झाले नाही ते सुद्धा या निवडणुकीत जर पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून लढतील अशी चर्चा सुद्धा मतदार राजा करत आहे.

काही उमेदवारांचे 20 हजार, 25हजार , 30 हजार असे मतदान पक्के असल्याने हे सर्व उमेदवार नक्कीच पक्षाकडून किंवा अपक्ष उभे राहतील यात काही शंका नाही. मागील दोन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदारांना पक्ष पुन्हा त्यांना तिकीट देतील की नवीन चेहऱ्याला संधी देतील हे मात्र वेळेच ठरवणार आहे, मात्र 2024 ची वणी विधानसभा निवडणूक अतिशय रंगतदार व चुरशीची होणार यात तीळ मात्र शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular