Saturday, October 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

2024 विधान सभा निवडणुकीचे वारे झाले सुरू… वणी विधानसभेत उमेदवार लागले कामाला…..

विरोधक सत्ताधाऱ्यांना धरणार धारेवर… जनता पाहणार खेळ… वणी विधानसभा क्षेत्रात समस्याचे माहेर घर…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि आता सर्वच पक्ष जोमाने कामाला लागलेले आहे आपल्या परिसरात अनेक समस्या अनेक प्रश्न प्रलंबितच आहे काही सुटले काही सुटले नाही. सत्तेत नसणारे आता वेगवेगळे प्रश्न उचलायला सुरुवात करतील व सत्ताधारी विकास विकास केल्याचे पुरावे सादर करतील आम्ही उत्कृष्ट आम्ही श्रेष्ठ असे वारंवार सांगतील त्यामुळे आता जनता खूप हुशार झाली आहे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही इतकं मात्र स्पष्ट आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागल्यामुळे सगळे नेते पुढारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत तसेच ज्यांना यावेळी 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहणारे नवोदित उमेदवार हे नेत्याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंदोलनातून कार्याला लागलेले आहे.

काही उमेदवार या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात आणि नाहीच जमल तर अपक्ष आहेच असे चित्र पाहायला मिळत आहे. काही उमेदवार म्हणतात पक्षांनी संधी दिल्यास निवडणूक लढण्यास तयार आहे, मात्र हे उमेदवार कोणतेही कार्य करतांना दिसत नाही, त्यामुळे पक्ष यांना उमेदवारी देईल का हा प्रश्नचिन्ह आहे.

2024 च्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शिंदे गट शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, कॉम्रेड, आम आदमी पार्टी आणि अपक्ष उमेदवार या विधानसभेत उभे राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular