Monday, September 7, 2026
Google search engine
spot_imgspot_img

कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… भक्ती मध्ये शिव भक्त झाले दंग…

प्रतिनिधी: आकाश दुबे, वणी

कावड यात्रेतील सुंदर दृश्य

वणी ते शिरपूर कावड यात्रा आज 17 ऑगस्ट रोजी स्थानिक जैताई माता मंदिर येथून भव्य कावड यात्रेला सुरुवात झालेली आहे. ती नियोजित मार्गाने शिरपूर महादेव शिखर मंदिर येथे पोहचली. या यात्रेला प्रारंभ झाल्यावर भक्त गण प्रत्येक ठिकाणाहून हजारो शिवभक्त यात सहभागी झाले.

विशेष म्हणजे कलावंत, डीजे, भजन कीर्तन आणि वाद्यांच्या साथीने भगवान शिव तांडवाचे रूप धारण केले असून, कावड यात्रा वणीच्या जैताई माता मंदिर, टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, काठेड ऑइल मिल, श्री रंगनाथ स्वामी चौक, ते शिरपूर गड, या मार्गांवरून मोठ्या थाटामाटात शिव जय घोषणाने शिरपूर येथे पोहचली. यात्रे दरम्यान, ठिकठिकाणी नि: शुल्क चहा अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी तारेंद्र बोर्डे, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, राजू उंबरकर, विजय चोरडिया, राकेश खुराणा, संजय खाडे, अनिल पाटील, निकेत गुप्ता,विजय चोरडिया, परमजीत सिंग रंधवा, मुकेश साहुजी, राजा जैस्वाल, आशिष खुलसंगे, योगेश अग्रवाल, तसेच इतरही मान्यवर, लहान मूल मुली, मोठ्या प्रमाणात महिला पुरुष आणि शिवभक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular