वरोरा रस्त्यावरील नायगाव परिसरात शिवसेनेचे उबाठा पक्षात तरुणांचा….
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
वणी विधानसभा क्षेत्रात ” गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक ” हे अभियान शिवसेना अंतर्गत राबविण्यात येत आहे. सध्या राजकारणात साकेत भूजबलराव हे खूप सक्रिय असल्याने त्यांचे समाजकारणात व राजकारणात फार मोठे योगदान आहे. मागील पाच वर्षांपासून गावागावातील युवा पिढीला मार्गदर्शनाणे प्रोत्साहित करत असून युवा सेनेमध्ये सक्रिय आहे. वेगवेगळ्या माध्यमातून अनेक उपक्रम करतात. वर्षभरात त्यांनी अनेक युवकांना युवासेनेचे व शिवसेनेचे उबाठा पक्षात प्रवेश करून घेतला आहे.

शहरातील टागोर चौक शाखेचे उद्घाटन युवासेना वणी शहराचे युवानेते साकेत भुजबलराव यांच्या नेतृत्वात आणि वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर व युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे तथा वणी विधानसभेचे संपर्क प्रमुख विश्वआनंद पेंडणेकर यांच्या हस्ते टागोर चौक शाखेचे उद्घाटन सुद्धा केले. सध्या ते युवा पिढीसाठी एक आदर्श युवा नेता असून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजात पोहचविण्याचे कार्य खूप जोमाने करत आहे . कीर्ती लहान मूर्ती महान या कमी वयाचा युवक शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अथक परिश्रम घेत असून नवयुवकांमध्ये एक आदर्श युवा नेता उभरला आहे. यामुळे युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. 24 ऑगस्ट ला युवासेना वणी शहराचे युवा नेते साकेत भुजबलराव यांच्या नेतृत्वात वरोरा रस्त्यावरील नायगाव परिसरात युवकांचा पक्षप्रवेश करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर , माजी उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास , राज्य कार्याध्यक्ष अविनाश भुजबलराव , युवासेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे व माजी उप शहरप्रमुख अजय चन्ने, युवासेना वाशिम जिल्हा प्रमुख संकेत ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला . वैभव पिंपळशेंडे व सुनील खडतकर, लखन व त्यांच्या मित्रपरिवाराने युवा सेनेमध्ये प्रवेश घेतला.

त्यावेळेस राज्य संघटक सतीश जोगी, कुंभा शाखा प्रमुख अंकुश जोगी, सामित भुजबलराव , अनिकेत टिकले व समस्त युवासेनेचे आजी,माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





