प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

सर्वम चर्मकार समाजाच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री नानासाहेब उर्फ बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाने चर्मकार समजाच्या विविध मागण्याना घेऊन येत्या 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11. वाजता आझाद मैदान मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केले आहे .

यवतमाळ जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी वणी येथील संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र सभेत केले.
विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी कार्यकर्त्यांशी मोर्चा संदर्भात सविस्तर चर्चा करून मोर्चाचे छापील पत्रके जिल्हाध्यक्ष महेश लिपटे यांच्या कडे स्वाधीन केले . जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवानी 1 ऑक्टोबरला आझाद मैदान, मुंबई येथे उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले.


यावेळी प्रदेश निरीक्षक गजानन भटकर , विदर्भ युवा अध्यक्ष प्रणय बसाशंकर , परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, सल्लागार माऊली महाराज पारडीकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना नीयोजनाबाबत सूचना केल्या.
यावेळी प्रदेश महिला कोषाध्यक्ष मीनाक्षी डूबे, संत रविदास प्रबोधन केंद्र अध्यक्ष दौलत वाघमारे, जिल्हाध्यक्ष महेश लिपटे ,जिल्हायुवा अध्यक्ष सुबोध बांगडे, युवाजिल्हा उपाध्यक्ष आकाश दुबे , गठई कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष संजय खोब्रागडे, शहरअध्यक्ष प्रकाश राजूरकर, महिला जिल्हा अध्यक्ष सुनिता लांडगे, युवती जिल्हा अध्यक्ष प्रनोती बांगडे, वणी तालुका अध्यक्ष भरत लिपटे, झरी तालुका अध्यक्ष संतोष मुळे, पांढरकवडा तालुका अध्यक्ष दिलीप काकडे, वणी तालुका युवा अध्यक्ष आशिष डूबे आदी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.




