Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा अभियान…वणी केंद्रातून न.प.शाळा क्रं. 7 शाळा सर्वोत्कृष्ट…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

  • महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळेचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थेकडून संचालित शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मुखमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा ही स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेत वणी शहरातून नगर परिषद शाळा क्रं. 7 ही शाळा प्राथमिक विभागातून केंद्रातून प्रथम क्रमांकावर आलेली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे व प्रशासन अधिकारी गिरिधर चवरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार व येथील शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले आहे.
  • वणी नगर परिषद अंतर्गत चालणारी नगर परिषद शाळा क्रं. 7 ही शैक्षणिक दृष्ट्या प्रगत शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. वर्षभर अतिरिक्त वर्ग घेवून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे शासनातर्फे घेण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी मेरिट मध्ये येतात.
  • प्राथमिक विभागातून संगणक प्रयोगशाळा असलेली तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे. यासाठी विशेष शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या शाळेत प्रशस्त असे मोठे मैदान उपलब्ध आहे. त्यात शिक्षक वृंदानी मेहनत करून परसबागेची निर्मिती केली आहे. या शाळेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 65 लाख रुपयाचा निधी दिला आहे. याच शैक्षणिक सत्रात या शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षण देण्यासाठी दिड कोटीचा निधी विशेष योजनेतून मंजूर झाले आहेत. यातून या शाळेतील प्रत्येक मुलाला टेबल खुर्ची देवून प्रत्येकाला स्वतंत्रपणे कॉम्पुटर उपलब्ध करून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने अध्ययन – अध्यापन करण्यात येणार आहे. यासाठी येथील शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण होणार आहे.
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, सदस्य वृंद, येथील शिक्षक चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेन्दोर, विजय चव्हाण, दिगांबार ठाकरे, सोनू लांडे हे परिश्रम घेत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular