प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

पुरवठा विभागात दबंग अधिकारी म्हणुन ओळख असलेले संतोष उईके यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने वणी विभागामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी मोहाडी, जिल्हा भंडारा इथे कार्यरत होते. ते तालुका धान्य वाटपात महाराष्ट्रात टॉप फाईव्ह मध्ये आहेत . यांची कारकीर्द अत्यंत चांगल्या प्रकारची झाली. असून तिथे सुद्धा ते पुरवठा विभागाचे काम अत्यंत सुरळीतपणे पार पाडत होते.

शहरांमध्ये चालत असलेले फ्लॅश करण्यासाठी वणी शहरांमध्ये पुरवठा विभागामध्ये नियुक्ती करण्यात आली ते या वणी शहरांमधला कारभार चांगल्या प्रकारे पार पाडतील अशी जबाबदारी प्रशासनाने व शासनाने त्यांच्यावर टाकली. असून ते या वणी शहरात अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने काम करतील असा विश्वास ठेवून त्यांनी वणी शहरात येऊन आपला पदभार सांभाळला वणी शहरात दाखल होतास वणी शहरात सर्व धान्य दुकानदारंमध्ये कुजबूज तयार झाली आहे. आणि त्यांच्यामध्ये चर्चेचा विषय बनुन त्यांचे धाबे दणाणले आहे.

वणी शहरात सुज्ञ नागरिकांमध्ये आपल्या वणी शहराला चांगल्या पद्धतीचा पुरवठा निरीक्षक अधिकारी लाभला अशी सर्वत्र चर्चा आहे.





