Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

व्यक्तिमत्व घडवण्याच माध्यम म्हणजे रा.से.यो.- प्राचार्य प्रसाद खानझोडे….

विविध उपक्रमासह रा.से.यो.स्थापना दिन संपन्न.

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

विद्यार्थ्याचा सर्वागींण विकास करणे,स्वावलंबी बनविणे व खरे देशभक्त आणि उत्तम नागरीक बनवून व्यक्तिमत्व घडविण्याच माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. असे असे प्रतिपादन अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिवसा निमित्त व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या नाडी परिक्षण व पंचकर्म तज्ञ डॉ.सुवर्णा चरपे यांनी मनोगत व्यक्त करतांना व्यक्तिमत्वा घडवित असतांना निरोगी राहणे देखिल तितकेच महत्वाचे आहे. त्याकरीता नियमित व्यायाम करणे ,आरोग्याची काळजी घेणे, योग्य आहार व नियमित व्यायाम हि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. हा संदेश दिला.तर प्रमुख वक्ते प्रा.प्रफुल्ल कोसे इंग्रजी विभाग यांनी Not me But you या बिद्र वाक्याची चिकीत्सा करत रा.से.यो.च्या उपक्रमातून विद्यार्थी कसे घडतात हे सांगीतले.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या पोस्टर प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला . शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजुभाऊ मुक्केवार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी पोस्टर प्रदर्शनाला भेट दिली आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . यानंतर डॉ. सुवर्णा चरपे यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय त्यांनी सांगितले .या कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून झाली . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार यवतमाळ जिल्हा समन्वयीका तथा रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे यानी केले तर सुत्र संचालन प्रा डॉ. विकास जुनगरी यांनी केले . मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग या आयोजित कार्यक्रमामध्ये होता.

               
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular