प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
चर्मकार समाजाच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाने चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केले आहे.
यासाठी विदर्भातून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशा अनेक जिल्ह्यातून चर्मकार समाज बांधव मोठया संख्येने वणी येथून मुंबई ला रवाना झाले आहे.

यावेळी विदर्भ प्रमुख संबाजी वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्हाअध्यक्ष महेश लिपटे ,युवा जिल्हाउपाध्यक्ष आकाश दुबे , राज्य महिला उपाध्यक्ष समीक्षा भटवलकर,महिला जिल्हा अध्यक्ष सुनिता लांडगे,युवती जिल्हा अध्यक्ष प्रनोती बांगडे,वणी तालुका युवा अध्यक्ष आशिष दुबे, पांढरकवडा तालुका अध्यक्ष दिलीप काकडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पकुमार मेंढे, गटई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष तांडेकर, महिला जिल्हा अध्यक्ष शिला ढाक या पदाधिकाऱ्यांच्या आयोजनातून मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबई ला रवाना झाले.





