Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

प्रा. डॉ. निलीमा दवणे यांना विद्यापीठाने रा.से.यो. चा पुरस्कार देऊन केले सन्मानित…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजना सत्रात सभा दि.१४ व 15 ऑक्टोंबर ला पार पडली.या सभेत विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील रा.से.यो.विभागाने उत्कृष्ठ उपक्रम राबविलेल्या कार्यक्रम अधिकारी यांना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देवून सन्मानित केले जाते .सत्र २१-२२ करीता जे अर्ज मागतल्या गेले होते. त्यात लोकमान्य टिळक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे यांची उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्काराकरीता निवड झाली असून सत्रातं सभेत व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.रविन्द्र कडू , प्र -कुलगूरू डॉ.महेन्द्र ढोरे, समन्वयक डॉ.निलेश कडू यांच्या उपस्थित सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. गेली अनेक वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून रा.से.यो.च्या माध्यमातून लेक वाचवा अभियान, स्वच्छता मोहीन, रक्तदान ,मोफत औषधोपचार शिबीर, पाणी अडवा पाणी जिरवा, कृषी विषय व्याख्यान, महीला मेळावे, मुलीच्या जन्माचे स्वागत करू या, शोष खड्डे ,वृक्ष रोपन,यावरील रँली पथनाट्य,एड्स अभियान बेटी बचाव बेटी पढाव अभियान ,संत गाडगेबाबा दशसुत्री कार्यक्रमाअतर्गत अन्नदान,कपडे वाटप ,पुस्तके वाटप ,अनेक ठिकाणी व्याख्यान देवून प्रबोधन केले आहे.

रा.से.यो.चे अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेवून बक्षीसे प्राप्त केली आहे. प्रा. डॉ.दवणे मँडम यांनी राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व्यवस्थापक म्हणून देखिल उत्कृष्ठ जबाबदारी पार पाडत द्वितीय क्रंमाक प्राप्त करून दिला. आव्हान या राज्यस्तरीय आपतकालीन शिबीरात देखिल व्यवस्थापक म्हणून कामगीरी केली आहे. त्या विद्यापीठाला प्रथम स्थान मिळविले. डॉ.दवणे या आजीवन अध्यासन व निरतंन विभागाच्या कुलगूरू नामित सदस्य आहे व समाजशास्त्र विषयाच्या पीएचडी गाईड आहेत .या सर्व कार्याची दखल घेत कुलगूरू डॉ.मिलींद बारहाते यांनी डॉ.निलीमा दवणे यांची यवतमाळ जिल्हा रा.से.यो.समन्वयक म्हणून निवड केली आहे. आता उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देवून गौरव करून मानाचा तुरा रोवला गेला.

या यशाबद्दल शि.प्र.मं संस्थेचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडीया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के तथा सर्व सदस्य आणि प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे ,प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular