Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

महिलांनी स्व विकास साठी हिमतीने व संयमाने कार्य करावे -ठाणेदार अनिल बेहरानी

लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरण कार्यशाळा….

प्रतिनिधी: आकाश दुबे, वणी


महिला सक्षमीकरण संदर्भात बोलताना महिलांनी स्व विकास साध्य करण्यासाठी संयम व हिमतीने कार्य करणे महत्त्वाचे आहे स्वतःच्या सुरक्षेबरोबरच इतरांची सुरक्षा कशी करता येईल याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार दिले तर चांगल्या संस्कारच्या माध्यमातून एक चांगला नागरिक निर्माण होऊ शकतो आणि एक चांगला नागरिक देशाच्या विकासामध्ये हातभार लावतो त्याचबरोबर पुढे त्यांनी पोस्को कायद्या विषयी मत स्पष्ट केले तसेच पुढे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये आपल्या करिअरला आधी प्राधान्य दिले पाहिजे. असे प्रमुख वक्ते अनिल बेहरानी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले.

लोकमान्य टिळक महाविद्यालयात दिनांक 19 /10/ 2024 ला महिला सक्षमीकरणा संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत प्रस्तुत करताना विचार शून्यता हे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाच्या आड येत असलेला एक महत्त्वपूर्ण घटक आहे. एक चांगला विचार महिलां च्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा करतो म्हणून समाजातील प्रत्येक पुरुष वर्गांनी महिलांचे सक्षमीकरण व्हावे या अनुषंगाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. महिलांनी सावधगिरीने कशाप्रकारे वागावे याबाबत या महिला सक्षमीकरण कार्यशाळेमध्ये माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा . से. यो. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ . विकास जुनगरी यांनी केले या कार्यक्रमा चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रसाद खानझोडे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांच्या मार्गदर्शनात झाले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular