वणी तहसील कार्यालयात घडली घटना…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
वणी तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी यांना आज गुरुवार दि. २४ ऑक्टोबर ला दुपारी ३ वाजता दरम्यान ७० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्या गेले. सदर कारवाई ही अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती आहे.
तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष उईके यांनी कंट्रोल डीलर बंडू देवाळकर चिखलगाव यांना राशन दुकानाच्या कामासाठी ७० हजार रुपयाची लाच मागितली होती. यावरून बंडू देवाळकर यांनी संतोष उईके यांची लाच लुचपत विभाग अमरावती यांचेकडे तक्रार दाखल केली असता लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती विभाग यांनी आज सापळा रचला व त्यानुसार संतोष उईके यांना तहसील कार्यालयातच ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करून पुढील कारवाईसाठी शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले होते.




