Wednesday, September 9, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे व्याख्यानाचे आयोजन…


AM न्यूज वृत्तांकन, मारेगाव

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव, येथील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. अभिमन्यु महेश्वरी, सहाय्यक प्राध्यापक, बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा हे उपस्थित होते. व्याख्यानाचा विषय “Stress Physiology” हा होता. मनुष्य व वनस्पतीवर येणारे stress हे कश्याप्रकारे हाताळावे. याचे विद्यार्थ्यांना उत्तमरित्या मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा. डॉ. गजानन सोडनार, मार्गदर्शक डॉ. संदीप केलोडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद चव्हाण, यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल अडसरे व प्राजक्ता लांबट, प्रणाली अलाम या विद्यार्थिनी केले व आभार प्रदर्शन श्रेया राहुरे या विद्यार्थिनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला. तर या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. तानुरकर, डॉ. घोडखंदे, डॉ. कांबळे, डॉ. आत्राम, डॉ. चीरडे, डॉ. वांढरे, प्रा. जेनेकर, प्रा. शेंडे, प्रा. जाधव, पंढरपूरे, कुमरे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमा करिता प्रा. प्रदीप माकडे व प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी यशस्वी करण्या करिता परिश्रम घेतले. या कार्यक्रमा करिता बी. एस. सी. भाग 1, 2 व 3 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular